Aurangabad, Jalna receives heavy rainfall
Aurangabad, Jalna receives heavy rainfall 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाची उसंतच पाहायला मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. तर, जालना जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ७, लातूरमधील १८, उस्मानाबादमधील १४, परभणीतील ८, नांदेडमधील १२, तर हिंगोली जिल्ह्यातील १४ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मंडळात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय परभणीत इतर मंडळात पाऊस तुरळकच झाला. जालना जिल्ह्यातील ३९ मंडळांत तुरळक पाऊस झाला. राजुर मंडळात २८.८ मिलिमीटर, जाफराबाद २३.३, कुंभारझरी ४५.५, टेंभुर्णी ४५.३, वरुड १९.३, अंबड १६.३,दाभाडी १५, तर ढोकसाळ मंडळात १७.५ मिलिमीटर पाऊस झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यातील ५२ मंडळांत तूरळक, हलका, मध्यम तर काही मंडळात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील औरंगाबाद मंडळात २० मिलिमीटर, लाडसावंगी ३०, वरुडकाझी १५, पाचोड २०, पिंपळगाव १५ ,भावसिंगपुरा २६, आमठाणा ५३, अंभई १५, गोळेगाव २५, बोरगाव बाजार ३२, सावळदबारा २०, महालगाव ४४, लाडगाव ४२, लासुरगाव ४५, नागमठाण ३६, मांजरी ४२, शेंदूरवादा १५, सिद्धनाथ वडगाव २०, हरसुल ५५, डोणगाव १९, भेंडाळा १९, पिशोर ४१, करंजखेडा ३१, नाचनवेल १७, तर चिंचोली लिंबाजी मंडळात ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाने सरासरी ओलांडली

मराठवाड्यात १ जून ते २४ सप्टेंबर दरम्यान ६४६.३ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात ७९२.२ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १६८.८ टक्के, जालना १६१.६ टक्के, बीड १२९.२ टक्के, लातूर १०८.६ टक्के, उस्मानाबाद १०३ टक्के, नांदेड १००.७ टक्के, परभणी १०७.७ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात १२१.९ टक्के पावसाचा समावेश आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ५७०.८ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ८८.३ टक्केच पाऊस झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT