In Aurangabad district, the area under rabi onion has increased by three thousand hectares this year 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बी कांद्याचे क्षेत्र तीन हजार हेक्टरने वाढले

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात रब्बी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी १६ हजार ५३९ हेक्‍टरवर असलेला कांदा यंदा १९ हजार ३७७ हेक्टरवर पोहोचला आहे.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात रब्बी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी १६ हजार ५३९ हेक्‍टरवर असलेला कांदा यंदा १९ हजार ३७७ हेक्टरवर पोहोचला आहे. साधारणतः जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्राइतके दिसणारे कांदा क्षेत्र पारंपरिक पीक घेणाऱ्या तालुक्याव्यतिरिक्त इतरही तालुक्यात वाढले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बी कांद्याचे सरासरी क्षेत्र १९ हजार ९३० हेक्टर आहे. त्या तुलनेत गतवर्षी १६ हजार ५३९ हेक्‍टरवर कांदा लागवड झाली होती. या क्षेत्रात औरंगाबाद तालुक्यातील ४३० हेक्टर, पैठण ७ हजार हेक्टर, फुलंब्री ३६७ हेक्टर, वैजापूर ५२०० हेक्टर, गंगापूर २१६९ हेक्टर, खुलताबाद ६७ हेक्टर, सिल्लोड ३९ हेक्टर, सोयगाव २४ हेक्टर, तर कन्नड तालुक्यातील १२४३ हेक्टर कांदा क्षेत्राचा समावेश होता. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद, वैजापूर, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि कन्नड तालुक्यात विशेषत्वाने रब्बी कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. हंगामात कांद्याला मिळालेला सरासरी दर या मागचे प्रमुख कारण मानले जात आहे.

  ६८८ हेक्‍टरवर बटाटा 

यंदाच्या रब्बी हंगामात औरंगाबाद जिल्ह्यातील ६८८.८० हेक्‍टरवर बटाट्याची लागवड झाली आहे. बटाट्याचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ५९५ हेक्टर आहे. गतवर्षी टोमॅटोची केवळ २६.५२ हेक्टरवर लागवड झाली होती. टोमॅटोचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ३ हजार ७९२ हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात यंदा ११८३ हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. गतवर्षी रब्बी टोमॅटोचे क्षेत्र केवळ १६५ हेक्टर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने

Turmeric Market: वायदेबंदीची अवास्तव मागणी

Agricultural Rain Damage: एक लाख २४ हजार हेक्टरवरील पिके बाधित

Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा

SCROLL FOR NEXT