मुख्य बातम्या

कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन

सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.  किन्हई (ता. कोरेगाव) येथील कृषिभूषण अशोक गजानन चिवटे यांच्या भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, विभागीय कृषी सह संचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, राहुल बर्गे तसेच शेतकरी उपस्थित होते.  भुसे म्हणाले, ‘‘सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन कृषी विभागात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून, शेतकरी गट, महिला बचत गट यांना कृषी विभागामार्फत आवश्यक मदत केली जाईल. शेतकरी महिलांसाठी कृषी विभागाच्या ३० टक्के योजना आहेत, त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.  कोरोना संसर्गामुळे देशासह राज्यात निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था संभाळण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या अनेक योजना असून, त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे-जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल.’’  आमदार शिंदे म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडेही वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्यात मत्स्य शेती करावी.’’ या वेळी बानुगडे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिक गजानन चिवटे, आबासाहेब भोसले यांचासह पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT