मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर टॅगिंग

टीम अॅग्रोवन

परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या पशुसंजीवनी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील दुधाळ जनावरांना आधार क्रमांक दिला जात आहे. मंगळवारअखेर (ता. २०) या योजनेअंतर्गत गायी, म्हशी मिळून एकूण १३ हजार ७२५ दुधाळ जनावरांना इअर टॅगिंग करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंर्वधन विभागाच्या सूत्रांनी दिली.

१९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात २२८० विदेशी गायी, ५३,३३६ देशी गावरान गायी, ३४,२२८ म्हशी अशी एकूण ८९ हजार ८४४ दुधाळ जनावरे आहेत. यामध्ये परभणी तालुक्यातील १६,५७८, जिंतूर तालुक्यातील १७,५९९, सेलू तालुक्यातील ६९३९, मानवत तालुक्यातील ५५५३, पाथरी तालुक्यातील ६२०७, सोनपेठ तालुक्यातील ४३५१, गंगाखेड तालुक्यातील १२,१४६, पालम तालुक्यातील ८६१८, पूर्णा तालुक्यातील ११ हजार ८५३ जनावरांचा समावेश आहे.

या जनावरांना आधार क्रमांक देण्यासाठी एकूण ३७ हजार ४०० इअर टॅग प्राप्त झाले आहेत. आजवर परभणी तालुक्यातील २ हजार १५, जिंतूर तालुक्यातील ३७४७, सेलू तालुक्यातील ९१९, मानवत तालुक्यातील १७०९, पाथरी तालुक्यातील ४३१, सोनपेठ तालुक्यातील १२४१, गंगाखेड तालुक्यातील १७२१, पालम तालुक्यातील ६९१, पूर्णा तालुक्यातील १२५१ अशा एकूण १३ हजार ७२५ जनावरांना इअर टॅग लावण्यात आले आहेत. त्यापैकी ५ हजार ७७२ जनावरांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली आहे.

दुधाळ जनावरांना आधार क्रमांक दिल्यामुळे शासनाच्या दुग्धोत्पादन वाढीसाठीच्या योजना राबविण्यासाठी डाटा उपलब्ध होणार आहे. याशिवाय जनावराच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठीदेखील आधार क्रमांक उपयुक्त ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT