चुकीचे कृत्रिम रेतन करणारा पशुधन पर्यवेक्षक निलंबित
चुकीचे कृत्रिम रेतन करणारा पशुधन पर्यवेक्षक निलंबित 
मुख्य बातम्या

चुकीचे कृत्रिम रेतन करणारा पशुधन पर्यवेक्षक निलंबित

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात काम करणारे सहायक पशुधन विकास अधिकारी भरत माने हे सतत गैरहजर राहत असल्याने आणि चुकीच्या पद्धतीने कृत्रिम रेतन केल्याचा ठपका ठेवत पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी त्यांना निलंबित केले आहे. दोन्हीही अधिकारी, कर्मचारी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अनुक्रमे बीबी दारफळ व अकोलेकोटी येथे कार्यरत आहेत.  श्री. माने हे बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे कार्यरत असताना ते नियमित गावामध्ये येत नसल्याची तक्रार सुरेश साठे यांनी केली होती. त्यांनी दारूच्या नशेत दिलेल्या चुकीच्या उपचारामुळे गाय खाली झाल्याचेही श्री. साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. गावच्या सरपंचांनीही श्री. माने हे गावात येत नसल्याची तक्रार केली होती. या सगळ्या तक्रारींचा विचार करून श्री. माने यांना निलंबित करण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी दिले. मोहन चौधरी हे सध्या वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे कार्यरत आहेत. ते बीबी दारफळ येथे कार्यरत असताना अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी शाहू लामकाने यांच्या खिलार जातीच्या गाईला कृत्रिम रेतन केले होते. खिलारचे रेतन करण्याऐवजी त्यांनी जर्सीचे रेतन केले. परिणामी, जर्सी जातीच्या वासराने जन्म घेतला. श्री. चौधरी यांच्याकडून झालेली चूक त्यांनी कबूल केली. मात्र, त्या शेतकऱ्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. यावरून श्री. चौधरी यांनी गैरशिस्तीचे वर्तन केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT