milk  
मुख्य बातम्या

‘अमूल’कडून दूध विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ 

गुजरात सहकारी दूध पणन महासंघाने अमूल दुधाच्या विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर गुरुवारपासून (ता.१) देशभर लागू करण्यात आले आहेत.

टीम अॅग्रोवन

पुणे ः गुजरात सहकारी दूध पणन महासंघाने अमूल दुधाच्या विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर गुरुवारपासून (ता.१) देशभर लागू करण्यात आले आहेत. 

दुधाच्या विक्रीदरात यापूर्वी ‘अमूल’ने डिसेंबर २०१९ मध्ये प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली होती. त्यानंतर आता दीड वर्षांनी पुन्हा दरवाढ केली गेली आहे. अमूलची कर्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये आता सुधारित दरानुसार अर्धा लिटर अमूल गोल्डची पिशवी २९ रुपये, अमूल ताजा २३ रुपये आणि अमूल शक्ती दुधाची पिशवी २६ रुपयांना विकली जात आहे. 

‘‘गुजरात दूध महासंघाने दीड वर्षापासून दर स्थिर ठेवले होते. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी दुधाचे विक्री दर वाढविणे अपरिहार्य होते. ग्राहकांपर्यंत दूध पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या पुरवठा साखळीतील इतर सेवा व सामग्रीचे भाव वाढल्याचा देखील हा परिणाम आहे,’’ अशी माहिती अमूलच्या सूत्रांनी दिली. 

गुजरात सहकारी दूध पणन महासंघाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या दूध संघांनी गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५-६ टक्के दरवाढ दिली आहे. ग्राहकांपासून गोळा होणाऱ्या दहा रुपयांपैकी किमान आठ रुपये उत्पादकाच्या हातात जावेत, असे धोरण महासंघाचे आहे. 

दरम्यान, अमूलने दुधाच्या विक्रीदरात केलेल्या वाढीनंतर राज्याच्या डेअरी उद्योगातदेखील चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की अमूलने स्वतःचा ब्रॅंड इतका शक्तिशाली बनविला आहे, की प्रतिलिटर पाच रुपये वाढ केली तरी त्यांचा ठरलेला ग्राहक तेच दूध मागतो. दरवाढ केली म्हणून अमूलचा ग्राहक इतर ब्रॅंडकडे शिफ्ट (स्थलांतरित) होत नाही. 

अमूलने विक्रेता शुल्क (डीलर कमिशन) ते कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) यांच्यातील अंतर फक्त तीन रुपये ठेवली आहे. या उलट राज्यातील डेअरीचालकांनी हेच अंतर स्थानिक ब्रॅंडसाठी १५ रुपयांपर्यंत ठेवले आहे.  अमूलचा अभ्यास आवश्‍यक  महाराष्ट्रातील डेअरी उद्योगाची स्थिती बघता सध्या शेतकरी, विक्रेता व डेअरीचालक यांच्याऐवजी सर्व नफा सध्या डीलर्स लॉबीकडे जातो आहे. त्यामुळे आपण अमूलच्या धोरणाचा बारकाईने अभ्यास करायला हवा, असे मत श्री. कुतवळ यांनी व्यक्त केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती

Agrowon FPC Conference: नव्या दिशांवर झाले विचारमंथन

ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र

Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच

Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT