मक्यावर अमेरिकन लष्करी अळी American military larvae on corn 
मुख्य बातम्या

मक्यावर अमेरिकन लष्करी अळी

नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात मक्यावर अमेरिकन लष्करी अळी पडल्याचे दिसून आले आहे.सध्याच्या स्थितीत लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी असला तरी कृषी विभागाकडून जागृतीसह अन्य कुठल्या ही उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.

टीम अॅग्रोवन

नगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात मक्यावर अमेरिकन लष्करी अळी पडल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात ज्वारीवर अळी दिसून आली होती. त्यामुळे यंदा ही अमेरिकन लष्करी अळीचा मका, ज्वारीवर प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्याच्या स्थितीत लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी असला तरी कृषी विभागाकडून जागृतीसह अन्य कुठल्या ही उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.   नगर जिल्ह्यात रब्बीत ३६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र साधारण चाळीस हजार हेक्टरवर पेरणी होत असते. यंदा आतापर्यंत जिल्हाभरात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. ज्वारीचे जिल्ह्यात तब्बल पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. लवकर पेरा झालेल्या भागात ज्वारी पोटऱ्यात आहे. साधारण महिनाभरापूर्वी श्रीगोंदा तालुक्यात दोन ठिकाणी ज्वारीवर लष्करी अळी आढळून आली होती. अळी दिसून आलेल्या ज्वारीचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान केल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर अन्य ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तातडीने जागृती करून उपाययोजना सुचवल्याने वाढता प्रादुर्भाव रोखता आल्याचे सांगितले जात आहे. आता ज्वारीवर ही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथे अनेक ठिकाणी मक्याचे अळीने नुकसान केले आहे. अळीचा अजून प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने मात्र यंदा आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे दिसत आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागृतीचाही कृषी विभागाला विसर पडला आहे

...तर यंदाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी पन्नास टक्के मक्याच्या क्षेत्राचे  अमेरिकन लष्करी अळीमुळे नुकसान झाले होते. काही ठिकाणी ज्वारीवरही प्रादुर्भाव दिसला, मात्र त्यावेळी वेळीच उपाययोजना केल्याने ज्वारीचे नुकसान टळले. यंदाही मक्यावर अमेरिकन लष्करी अळी दिसून आली आहे. मागील महिन्यात श्रीगोंदा तालुक्यात ज्वारीवर प्रादुर्भाव दिसला. त्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना झाल्या नाहीत तर चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे..

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT