शेतीप्रश्नांवर सर्वपक्षीयांची  नाशिकमध्ये एकजूट All parties on agricultural issues Unite in Nashik
शेतीप्रश्नांवर सर्वपक्षीयांची  नाशिकमध्ये एकजूट All parties on agricultural issues Unite in Nashik 
मुख्य बातम्या

शेतीप्रश्नांवर सर्वपक्षीयांची नाशिकमध्ये एकजूट 

टीम अॅग्रोवन

नाशिक : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध आणि तीनही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी नाशिकमध्ये भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली बहुजन शेतकरी संघटना उभी राहिली आहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांचा समावेश असून, येत्या शुक्रवारी (ता. २६) रोजी या संघटनेतर्फे ‘बंद’ पाळला जाणार आहे. 

 देशभरातील विविध शेतकरी संघटना सहभागी झालेल्या व पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशातील शेतकरी तीन महिन्यांपासून नवी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन करीत आहेत. लाखो शेतकरी, महिला, तरुण या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.थंडी, वारा, ऊन, पावसाची तमा न बाळगता हे शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही. ही सर्व शेतकऱ्यांशी केलेली प्रतारणा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा गरज आहे. त्यासाठी राजकीय मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र यावे. या साठी बहुजन शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली आहे.

येत्या शुक्रवारी (ता. २६) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. तो यशस्वी करण्यासाठी संघटनेचे नेते बळवंत गोडसे, रमेश औटे, अशोक खालकर यांसह विविध नेत्यांनी गेले महिनाभर शेतकरी व विविध संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन या विषयावर जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना सहभागी होण्याबाबत निवेदन सादर केले आहे.    

   बहुजन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिवसेनेचे दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे, शेकापचे पी. बी. गायधनी, राजाभाऊ धनवटे, रमेश औटे, अशोक खालकर, भगूरचे माजी नगराध्यक्ष गोरख बलकवडे, अॅड सुदाम बोराडे यांसह विविध नेते उपस्थित होते. भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. 

बळिराजाला साथ द्या : किसान सभा  तिन्ही कृषी कायदे व प्रस्तावित वीजबिल कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. शेतमालाला हमी भाव मिळावा, यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. चार महिने आंदोलनाला पूर्ण होत आहेत. किसान मोर्चाने या पार्श्वभूमीवर ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. जिल्ह्यात भारत बंद यशस्वी करावा. शेतकरी, कामगार, व्यापारी सर्वांनी सहभागी होऊन बळीराजाला साथ द्यावी, असे आवाहन किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, सरचिटणीस देविदास बोपळे, जिल्हा संघटक विजय दराडे, उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे आदींनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT