मुख्य बातम्या

अकोट कृषी कार्यालयातील चार कर्मचारी निलंबित

टीम अॅग्रोवन

अकोला  ः मागील काही दिवसांत उघडकीस अालेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झालेले अकोट तालुका कृषी कार्यालय आता ''ॲक्शन मोड''वर अाले असून, एकाच वेळी चार जणांविरुद्ध निलंबनाची तडकाफडकी कारवाई करण्यात अाली अाहे. 

विभागीय सहसंचालकांनी दिलेल्या अादेशानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने गुरुवारी (ता. १२) ही निलंबनाची पत्रे संबंधितांना बजावल्याची माहिती अाहे. कृषी पर्यवेक्षक अशोक चौधरी, केशव वानखडे, कृषी सहायक मयूर गोफणे व संदीप तळोकार अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे अाहेत.

केशव वानखडे, अशोक चौधरी हे अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी पर्यवेक्षक, तर संदीप सुदाम तळोकार हे अासेगाव बाजार येथे कृषी सहायक, तर अाणि मयूर गोफणे हे दहीगाव येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत अाहेत. निलंबनाच्या काळात या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यालय देण्यात अाले. 

चौधरी यांना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अमरावती, मयूर गोफणे यांना उपविभागीय कृषी कार्यालय पुसद, सुदाम तळोकार यांना उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पांढरकवडा अाणि केशव वानखडे यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे मुख्यालय देण्यात अाले अाहे.  

या चौघांविरुद्ध एकाच वेळी निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्ह्याचा संपूर्ण कृषी विभागच हादरला अाहे. विभागीय सहसंचालक सुभाष नागरे यांनी ही तडकाफडकी कारवाई केल्याने एकच चर्चा सुरू झाली अाहे.

निलंबनाच्या अादेशात कारण देण्यात अालेले नसले, तरी गेल्या काळात लाच मागितल्याच्या अारोपाखाली या कार्यालयाचा प्रमुख म्हणजे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायिका अडकलेली अाहे. त्याच प्रकरणाशी निगडित ही कारवाई झाल्याचे समजते. मात्र याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT