संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जळगावमध्ये कृषी पदविका अभ्यासक्रमाला संथ प्रतिसाद

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्ह्यातील १३ कृषी विद्यालयांपैकी काही विद्यालयांचा अपवाद वगळता इतर विद्यालयांमध्ये यंदाही कृषी पदविका अभ्यासक्रमाला संथ प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील कृषी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या एकूण ७२० जागांपैकी केवळ ४५२ जागांवर प्रवेश झाले असून, २६८ जागा रिक्त आहेत.

जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्याने यंदाही मागील वर्षाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३ ऑक्‍टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

प्रत्येक कृषी विद्यालयास ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता प्राप्त आहे. जिल्ह्यात १३ कृषी विद्यालये असून, यातील दोन विद्यालये प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. त्यात पाल (ता. रावेर) व सायगाव (ता. चाळीसगाव) येथील विद्यालयांचा समावेश आहे. तर काही विद्यालयांमध्ये पदविका अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद आहे. मराठी अभ्यासक्रमानंतरही प्रतिसाद नाही जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने लागू केला होता. त्या वेळेसही प्रवेश प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर निकालांवरही मोठा परिणाम झाला होता. काही विद्यालयांमध्ये तर दोन ते तीनच प्रवेश प्रथम वर्षाला झाले होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील कृषी विद्यालयांचे व्यवस्थापन व प्रशासन यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून दोन वर्षांचा मराठी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम लागू करून घेतला. पण आता मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमालाही फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येत आहे.  

वाकोद (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील कृषी तंत्र विद्यालयात तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम आहे. या विद्यालयात पूर्ण ६० प्रवेश झाले आहेत. तर निमखेडी (ता. जळगाव) येथील शासकीय कृषी तंत्र विद्यालयातही ६० प्रवेश झाले आहेत.

जिल्ह्यातील काही विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद आहे. पण काही विद्यालयांमध्ये हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र ३ ऑक्‍टोबरनंतर प्रवेश दिले जाणार नाहीत. तसेच ३ तारखेनंतर अध्यापनाचे काम गतीने सुरू करावे लागेल.  - डॉ. अविनाश पाटील, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, निमखेडी (ता. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT