पुणे : मृग बहारातील संत्र्याला तीन डझनला सर्वाधिक १ हजार ११ रुपये दर मिळाल्यानिमित्त शेतकरी राजेंद्र करंडे यांचा बाजार समितीच्या वतीने मंगळवारी (ता. ३) सत्कार करण्यात आला.
पुणे : मृग बहारातील संत्र्याला तीन डझनला सर्वाधिक १ हजार ११ रुपये दर मिळाल्यानिमित्त शेतकरी राजेंद्र करंडे यांचा बाजार समितीच्या वतीने मंगळवारी (ता. ३) सत्कार करण्यात आला.  
मुख्य बातम्या

पुण्यात संत्र्याला विक्रमी दर

टीम अॅग्रोवन

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ३) संत्र्याला ३ डझनला सर्वाधिक १ हजार ११ रुपये दर मिळाला आहे. देहरे (ता. जि. नगर) येथील शेतकरी राजेंद्र करंडे यांच्या बागेतील संत्रा असून, राेहन उरसळ या आडत्याद्वारे ते विक्री केले जातात. सर्वाधिक दर मिळाल्यानिमित्त बाजार समिती आणि उरसळ यांच्याकडून शेतकरी करंडे यांचा सत्कार करण्यात आला. 

याबाबत बाेलताना करंडे म्हणाले, आमची १२ एकर संत्री असून, ९ वर्षांमध्ये विविध टप्प्यांमध्ये लागवड केली आहे. मृग बहारातील हंगाम पकडण्यासाठी मे महिन्यात ताण देऊन फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उत्पादन घेतले जाते. 

या हंगामात ४० टन संत्र्यांची विक्री केली असून, यामध्ये ४५० ते १ हजार रुपये दर मिळाला आहे. यामध्ये एक टन संत्री आणली हाेती. यासर्व संत्र्यांना १ हजार ११ रुपये दर मिळाला. या वेळी बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, संचालक राजेंद्र काेरपे, सचिव बी. जे. देशमुख, ज्येष्ठ आडते सतिष उरसळ, राेहन उरसळ, आडते असाेसिएशनचे संचालक युवराज काची यांच्या उपस्थितीत शेतकरी करंडे यांचा सत्कार करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT