मुंबईकडे आगेकूच करण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांचे नियोजन
मुंबईकडे आगेकूच करण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांचे नियोजन  
मुख्य बातम्या

मुंबईकडे आगेकूच करण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांचे नियोजन

टीम अॅग्रोवन

पाटण, जि. सातारा :  कोयना प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवसही आंदोलनाबाबतचा ठाम निर्धार दर्शविणारा ठरला. रविवारी (ता. 18) पाडव्याची गुढी उभारून सोमवारी मुंबईकडे लॉंग मार्चला सुरवात करण्याच्या उद्देशाने प्रकल्पग्रस्तांनी बुधवारपासून नियोजनास प्रारंभ केला आहे.

कोयनानगर येथील शिवाजी महाराज क्रीडांगणावर 26 फेब्रुवारीपासून कोयना प्रकल्पग्रस्त विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनास बसले आहेत. श्री. पाटणकर यांनी शनिवारपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक नाही झाली, तर रविवारी आंदोलनस्थळी गुढी उभारून सोमवारी प्रकल्पग्रस्त मुंबईकडे लॉंग मार्चसाठी आगेकूच करतील, असे जाहीर केले आहे.

बुधवारी (ता. 14) आंदोलनस्थळी डॉ. पाटणकर यांनी आंदोलनाच्या नियोजनाबाबत प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. सोमवारी पाटण, कऱ्हाड, जावळी व महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील सर्व सदस्यांसह सहभागी होतील व पुढील प्रवासात राज्यात विखुरलेले प्रकल्पग्रस्त सहभागी होऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवतील, असे सांगितले. या वेळी चैतन्य दळवी, हरिश्‍चंद्र दळवी, बळिराम कदम, संजय लाड, शैलेश सपकाळ, दत्ता देशमुख, महेश शेलार, दीपक साळवींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT