अकोला ः हेडा वेअरहाऊसमध्ये लागलेली अाग विझवताना.
अकोला ः हेडा वेअरहाऊसमध्ये लागलेली अाग विझवताना. 
मुख्य बातम्या

अकोल्यात वेअरहाऊसला अाग

टीम अॅग्रोवन

अकाेला  ः येथील औद्याेगिक वसाहतीत बाभूळगाव-कुंभारी मार्गावर असलेल्या हेडा वेअरहाऊसला गुरुवारी (ता. २६) लागलेल्या अागीत कोट्यवधींचे सोयाबीन, तूर अाणि कापूस गाठी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली अाहे. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पाेचून आग नियंत्रणात अाणण्याचे अाटोकाट प्रयत्न केले.   

औद्याेगिक वसाहतीमधील कुंभारी मार्गावर हे वेअरहाऊस अाहे. सकाळी ८ वाजेच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केले व पाहता पाहता गोदामातील साेयाबीन, तुरीचे पोते आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दाेन गाड्या घटनास्थळी पाेचल्या. त्यानंतरही आगीवर नियंत्रण न आल्याने आणखी एक गाडी बोलविण्यात अाली.

माेठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले. अागीत जळालेले धान्य व कापसाची किंमत काेट्यवधीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कारण मात्र अद्याप समाेर आलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT