चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील 
मुख्य बातम्या

कर्जमाफी प्रक्रियेत दहा लाख बोगस अर्ज : चंद्रकांत पाटील

Raj Chougule

कोल्हापूर  : कर्जमाफीचा लाभ घेऊ इछिणाऱ्यांमध्ये दहा लाख बनावट अर्ज आल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. ११) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पात्र ८० लाख शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यभरातून सुमारे ७२ लाख ऑनलाइन अर्ज राज्य शासनाकडे आले आहेत. या संदर्भात शासनाने काही समित्या नेमल्या आहेत. या समित्यांमार्फत स्कूटनी केली जाईल. राज्यभरात ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे. पण सुमारे दहा लाख अर्ज बनावट असल्याचा सरकारचा संशय आहे. त्यामुळे अशा बनावट शेतकऱ्यांनाच ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहे.

दरम्यान उर्वरित ८० लाख शेतकरी मात्र कर्जमाफीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. त्याची प्रक्रिया आता जलद सुरू आहे. यामध्ये काही अडचणी आल्या तर हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे. त्यांच्यासाठी योग्यवेळी सवलतही दिली जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT