कृषी प्रदर्शन उद्घाटन
कृषी प्रदर्शन उद्घाटन  
मुख्य बातम्या

‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनास सांगलीत उत्साहात प्रारंभ

टीम अॅग्रोवन

सांगली: गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. ५) सांगली येथे उत्साहात उद्‍घाटन झाले. सोलापूर जिल्ह्यातील आजनाळे (ता. सांगोला) येथील प्रगतिशील शेतकरी राजाराम यलपले पाटील यांच्या हस्ते फीत कापून रविवार (ता. ७) पर्यंत चालणाऱ्या या कृषी मेळ्यास प्रारंभ झाला. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.  विट्याच्या नेचर केअर फर्टिलायर्झचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत कुलकर्णी, व्यवस्थापक (सेल्स) सुजित पाटील, मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडियाचे व्यवस्थापक डॉ. सी. एस. जाधव, प्रगतिशील शेतकरी गुणवंत गरड, सकाळ (कोल्हापूर)चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ‘ॲग्रोवन’(कोल्हापूर)चे व्यवस्थापक शीतल मासाळ आदी उपस्थित होते. येथील नेमिनाथनगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार आहे. शेती क्षेत्रात उल्लेनीय काम करणाऱ्या शेतीपूरक व्यवसाय, निविष्ठा, यंत्राच्या कंपन्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या भेटीला आल्या आहेत. याबरोबर काही शेती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्सही प्रदर्शनात सज्ज झाले आहेत. विशेष करून सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांची खास उत्सुकता दिसून आली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते निविष्ठा याबाबतीत स्वारस्य दाखविले. अलीकडच्या काळात पशुधन सांभाळणे, त्याचे व्यवस्थापन करणे अडचणीचे होत आहे. पशुधन व्यवस्थापनात आधुनिकता आणण्यासाठीच्या उपायांबाबत शेतकऱ्यांनी सहभागी कंपन्या, संस्थांशी संवाद साधला. उत्कृष्ट जातीच्या जनावरांची वीर्य बॅंक, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाऊस टेक्‍नॉलॉजी आणि इप्लिमेंटसच्या स्टॉलकडेही शेतकऱ्यांचा ओढा दिसून अाला.   व्याख्यानांना प्रतिसाद प्रदर्शनाच्या दालनातच विविध पिकांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शेतकरी राजाराम यलपले-पाटील व डाळिंबतज्ज्ञ गुणवंत गरड यांचे फळ लागवड व निर्यातक्षम डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात कालवडेच्या कल्याणी गोरक्षण ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नीलेश मालेकर यांचे पीकवाढीचे तंत्र आणि मंत्र या विषयावर व्याख्यान झाले. या सर्व व्याख्यनांचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला.   प्रदर्शनाचे आकर्षण

  • सेंद्रिय शेतीविषयी सर्वकाही
  • जगभरात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या उत्कृष्ट प्रजातींच्या विर्याचे जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र व विर्य बॅंक
  • शेततळी, शेडनेट, मल्चिंगची विविध दालने
  • सर्वाधिक उत्पादनवाढीसाठी पोषणमूल्य करणारी खते, औषधे
  • पाणी व्यवस्थापन बचत आणि त्यातून सुधारणा करणाऱ्या बाबी.  
  • हुमणीच्या समूळ उच्चाटनाचे तंत्र
  • पेरणी यंत्र, कडबा कुट्टी जनावरांचे मॅट
  • ट्रॅक्‍टर अवजारे, कृषिविषयक विविध पुस्तके 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

    Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

    Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

    Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

    SCROLL FOR NEXT