भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष
भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष 
मुख्य बातम्या

भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा : स्वतंत्र विदर्भाबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणा हे राजकीय स्वार्थासाठीचे पोकळ आश्‍वासन असून, भाजपने पश्‍चिम महाराष्ट्रवर साडे तीन वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.  राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे आली. येथील प्रीतिसंगमावरील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार चित्रा वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, की शिवसेना डबल गेम खेळते आहे. सत्तेत राहून निर्णय प्रक्रियेत सहभागी होते. साडेतीन वर्षांत एकदातरी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी विरोध केल्याचे ऐकीवात नाही. मात्र निर्णय एकत्रित घ्यायचा, एखादा निर्णय प्रमुखांना न आवडल्यास त्याविरोधात बोलायचे, असे त्यांचे सुरू आहे. 

उदयनराजे वरिष्ठ नेते...

खासदार उदयनराजे भोसले हल्लाबोल यात्रेतील अनुपस्थितीबाबत ते म्हणाले, की खासदारांचे काम स्वयंभू पद्धतीचे आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा जिल्ह्यात येतात, तेव्हा ते त्यांच्यासोबत असतात. इतरवेळी त्यांना लोकसभेचे तसेच अन्य मोठे व्याप आहेत. त्यामुळे छोटे कार्यकर्ते आल्यावर ज्येष्ठ नेते पवार यांच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांनी आमच्याबरोबर राहणे बरोबर नाही. ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात, असाही खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT