मुख्य बातम्या

अकोट तालुक्याचा पदभार अाता ‘पातूर’कडे

टीम अॅग्रोवन

अकोला  ः मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अकोट येथील तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पार ढेपाळला अाहे. तालुका कृषी अधिकारीपदाचा अति.िरक्त पदभार घ्यायला येथे कुणीही पुढे येत नव्हते. अखेरीस या तालुक्यातील जबाबदारी अाता पातूर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे देण्यात अाली अाहे.

अकोट तालुका कृषी अधिकारी एका महिला कर्मचाऱ्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडले गेले. त्यानंतर याच तालुक्यातील अाणखी चौघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केल्या गेली. रिक्त असलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याचा पदभार चक्क कृषी सहायकाकडे सोपविण्याची वेळ प्रशासनावर अाली होती. या प्रकारामुळे अकोला कृषी विभागाची राज्यभर चर्चा झाली. 

अधिकारीच नसल्याने या तालुक्यात कृषी विभागाच्या सर्वच योजनांना खीळ बसली अाहे. शेतकरी कामे घेऊन अाली, तर त्यांचे समाधान करणारा सक्षम अधिकारी या ठिकाणी मिळत नव्हता. मार्च एंडचा अनेक योजनांचा निधी खर्च झालेला नाही. याच अाठवड्यात घेतलेल्या किसान कल्याण कार्यक्रमाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती खटकत होती. एकूणच अकोट तालुक्यात अधिकाऱ्यांविना कृषी विभागाच्या कामांना खीळ बसली अाहे. अाता अति.िरक्त पदभार घेतलेले अधिकारी किती प्रमाणात ही विस्कटलेली घडी सुरळीत करतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT