agriculture
agriculture  
मुख्य बातम्या

अद्ययावत शेतीसाठी कृषी हवामान तंत्रज्ञान प्रशिक्षण 

टीम अॅग्रोवन

नगर ः जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, हवामान अद्ययावत शेतीसाठी प्रगत कृषी हवामान तंत्रज्ञान याविषयावर ३० एप्रिल ते ०४ मे असे पाच दिवस ऑनलाइन प्रशिक्षण आयोजीत केले आहे.  शंभर जणांना या प्रशिक्षणासाठी निवडण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी असणाऱ्या शंभर जागांपैकी ५० जागा या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत व उर्वरित ५० जागा इतर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत.  या प्रशिक्षणामध्ये हवामान जनरेटर: परिचय आणि त्यांचे अनुप्रयोग, पीक हवामान संबंध, पाऊस आणि त्यात आंतर वार्षिक बदल , हवामान बदल, अनुकूलन आणि शमन पर्यायांमागील विज्ञान, हवामान आधारित कृषी सल्ला सेवा : सूक्ष्म स्तरावर भूमिका, हवामान अंदाज तंत्र आणि अंदाज मॉडेल , पीक सिम्युलेशन मॉडेल: पीक-हवामान संबंध आणि उत्पादन अंदाज समजून घेण्यासाठी साधने, मॉडेलचा वापर करून बदलत्या हवामानात पीक पाण्याची गरज निश्चित करणे, हवामान शास्त्रामधील उन्नत उपकरणे, लिनक्स सॉफ्टवेअर व कृषी हवामान शास्त्रातील वापर या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT