krushi vibhag
krushi vibhag 
मुख्य बातम्या

मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या कर्मचाऱ्यांकडून मदत

टीम अॅग्रोवन

नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये राज्य सरकारसह राज्यातील सर्व विभाग जोमाने कार्य करीत आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागातील कृषी सहायक ते कृषी संचालक या तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वेच्छेने मदत करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून ५ कोटी रुपये मदत म्हणून मार्च महिन्याच्या पगारातून कपात करण्यात यावे, याबाबत महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघ यांच्यावतीने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या पत्रात नमूद केले आहे, कि कृषी विभागातील सर्व संघटनांच्यावतीने तांत्रिक संवर्गातील कृषी सहाय्यक ते कृषी संचालक असे एकुण १७ हजार ८६ अधिकारी व कर्मचारी आहेत. ज्यामध्ये कृषी सहाय्यक यांचे एक दिवसाचे तर कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक व कृषी संचालक यांचे दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वेच्छेने कपात करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.  यावेळी संघटनेचे सहसचिव अभिजीत जमधडे, विशेष निमंत्रीत संजय एस.पाटिल, कृषि अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संजय सावंत, आर.डी.भोईटे, डी.एफ.पगार, जिल्हा संघटक समाधान पाटिल, कृषि पर्यवेक्षक संघटना, कृषि सहाय्यक संघटना सदस्य यांसह मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापति भटु पाटिल उपस्थित होते.  कृषी विभाग देखील अडचणीच्या काळात शेतकरी बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्याच्या मार्फत राज्यासह देशभरात भाजीपाला पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कामात सोशल डिस्टनसिंग व सुरक्षे संदर्भात सर्व नियम मिळून काम पाडले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.  कृषिमंत्री श्री. भुसे यांनी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केलेल्या भरघोस मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे ही अपेक्षा व्यक्त केली. विभागामार्फत सर्वानी एकत्र येऊन मदत करणेबाबत कृषी संचालक डॉ. के. पी. मोते व कृषी सह संचालक दादाराम सप्रे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती श्री. जमधडे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT