‘कृषी २०२२ - नवी सुरवात’वर होणार राष्ट्रीय चर्चा
‘कृषी २०२२ - नवी सुरवात’वर होणार राष्ट्रीय चर्चा 
मुख्य बातम्या

‘कृषी २०२२ - नवी सुरवात’वर होणार राष्ट्रीय चर्चा

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने याकरिताची दिशादर्शक चर्चा प्रक्रिया सुरू केली आहे. याच मुद्द्यावर १९ आणि २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमंत्री राधामोहनसिंह आदी उच्चपदस्थ देशभरातील २५० तज्ज्ञांसोबत येथे चर्चा करणार आहेत.  ‘कृषी २०२२-नवी सुरवात’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे येथे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याबाबत राष्ट्रीय कृषी चर्चासत्रात ऊहापोह होणार आहे. सामान्य शेतकऱ्यांपासून ‘नाफेड’ व ग्रामीण बॅंकांपर्यंतचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ‘पुसा’ संस्थेत होणाऱ्या या चर्चा-संवाद कार्यक्रमासाठी एकूण सात गटांची रचना करण्यात आली आहे. असे सांगून ते म्हणाले, की उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांबाबत हे गट तयार केले गेले आहेत. त्यातल्या एका गटाचे नेतृत्व मी करीत आहे. पिकाची काढणी झाल्यावर काय काय प्रक्रिया आवश्‍यक आहेत, याबाबत मी सादरीकरण करणार आहे. यावर कुणाच्या सूचना असल्यास pashapatelforfarmer@gmail.com या मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. २४ जानेवारीला याबाबतची प्राथमिक बैठक झाली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करून मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.  यांच्या नेतृत्वाखाली आहेत सात अभ्यास गट... १) डॉ. के. व्ही. राजू (इक्रिसॅट), डॉ. सतीश चंदर, महासंचालक, भारतीय खत संघ, डॉ. जावेद रिझवी. २) प्रा. वसंत गांधी, आयआयएम, अहमदाबाद ३) पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग, प्रा. सुखपाल सिंग, महासंचालक, सीआरआरआयडी ४) डॉ. डेव्हिड बर्गविन्सन, महासंचालक, (इक्रिसॅट), सुब्रतो बागची ५) एल रिनाझ, एस. के. मल्होत्रा, केंद्रीय आयुक्त ६) किरीट शिलत ७)) ए. एस. नंदा, कुलगुरू, गुरंदगड विद्यापीठ, पंजाब

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT