onion
onion  
मुख्य बातम्या

तासाभरातच संपले विद्यापीठाचे कांदा बियाणे 

टीम अॅग्रोवन

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांदा बियाण्यांची सोमवारी (ता. १४) ऑनलाइन विक्री केली. मात्र नोंदणीसाठी पोर्टल सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यानंतर अवघ्या एक तासातच बियाणे संपले. या काळात सुमारे आठ हजारांहून अधिक शेतकरी नोंदणीसाठी प्रयत्न करीत होते. मात्र उपलब्ध बियाणे संपताच पोर्टल बंद झाले. अवघ्या दीड हजार शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आणि राज्यभरातील साडेसहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेल्या ‘फुले समर्थ आणि फुले बसवंत ७८०’ या वाणाच्या कांदा बियाण्याची ऑनलाइन विक्री करण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. संकेतस्थळावर ११ जून रोजीपासून नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी नोंदणीचे प्रयत्न करीत असल्याने पोर्टल बंद पडले. त्यामुळे सोमवारी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी अकरा वाजता पोर्टल सुरू होताच एक तासाच बियाणे संपले. या काळात राज्यभरातून सुमारे आठ हजारांहून अधिक शेतकरी नोंदणीसाठी प्रयत्न करीत होते. मात्र केवळ दीड हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आणि उपलब्ध बियाणे संपताच पोर्टल बंद झाले. यंदा तरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळेल, या आशेवर बसलेल्या सुमारे साडेसहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. गेल्या वर्षी विद्यापीठाचा कांदा बियाणे दर प्रती किलो दीड हजार रुपये होता. यंदा तो दोन हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.  यंदा ३० क्विंटलची विक्री  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गेल्या वर्षीही कांदा बियाण्यांची ऑनलाइन विक्री केली होती. ‘फुले समर्थ आणि फुले बसवंत ७८०’ या वाणाचे ४ हजार २२० किलो बियाणे उपलब्ध झाले होते. ऑनलाइन पोर्टलवर विक्रीतून सुमारे ६० लाखांवर उलाढाल गेली होती. मात्र ऑनलाइन नोंदणीत अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने काही शेतकऱ्यांनी पंधरा लाख रुपये परत द्यावे लागले होते. या बाबत बियाणे विभाग स्पष्ट बोलत नाही. मात्र यंदा जेवढे बियाणे आहे तेवढ्याच शेतकऱ्यांची नोंदणी होईल, अशी पोर्टलवर सोय केली होती. यंदा अवघे तीस क्विंटल बियाणे उपलब्ध होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT