जाॅइंट अॅग्रेस्कोमध्ये पीक पैदासकार, कृषी शास्त्रज्ञांनी केले शिफारशी, संशोधनावर विचार मंथन
जाॅइंट अॅग्रेस्कोमध्ये पीक पैदासकार, कृषी शास्त्रज्ञांनी केले शिफारशी, संशोधनावर विचार मंथन 
मुख्य बातम्या

जाॅइंट अॅग्रेस्कोमध्ये पीक पैदासकार, कृषी शास्त्रज्ञांनी केले शिफारशी, संशोधनावर विचार मंथन

टीम अॅग्रोवन

नगर : राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत (जाॅइंट अॅग्रेस्को) गुरुवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशी १३ वेगवेगळ्या गटांमध्ये विविध पिकांचे वाण, यंत्र आणि संशोधन शिफारसीवर कृषी शास्रज्ञ, पीक पैदासकारानी त्या-त्या समितीसमोर चर्चेतून विचार मंथन केले. आज समारोप कार्यक्रमात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादरीकरण करून विविध समित्या मान्यता देतील.  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यातर्फे ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा (जॉइंट अॅग्रेस्को) गुरुवारी दुसरा दिवस होता. यंदाच्या जाॅइंट अॅग्रेस्कोमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, १ यंत्र, आणि ६२ संशोधन शिफारसी केल्या आहेत. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून २ वाण, १० यंत्र, ३५ संशोधन शिफारसी केल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून १ वाण, ६ यंत्र, ४० संशोधन शिफारसी केल्या आहेत. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून विविध पिकांचे २ वाण, ४५ संशोधन शिफारसी केल्या आहेत.  गुरुवारी दिवसभरात शिफारसी, वाण व यंत्रे यावर चर्चा करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती व व्यवस्थापन, उद्यानविद्या, पशु व मत्स विज्ञान विभाग, मूलभूत शास्त्रे, अन्न शास्त्रे, तंत्रज्ञ, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्रे, जैविक अजैविक, तण व्यवस्थापन नोंदणी प्रस्ताव, पीक सुधारणा धोरणे, यांसह पीक वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या, वाण प्रात्यक्षिक समिती, कृषी अवजारे प्रसारित समिती असे १३ ग्रुप केले असून त्यात राज्यातील शास्त्रज्ञ, पीक पैदासकार सहभागी झाले होते. त्यात त्यानी शिफारसी, वाण आणि यंत्राना का मान्यता द्यावी यावर विचार मंथन करून सादरीकरण केले. समित्या आज समारोप कार्यक्रमात कृषी मंत्र्यासमोर सादर करणार आहेत.  आज जाॅइंट अॅग्रेस्कोचा समारोप राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यातर्फे ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा (जॉइंट अॅग्रेस्को) शुक्रवारी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. चारही विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, विद्यापीठातील संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित राहतील असे महात्मा फुले कृषी विद्यापीठातून सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT