शेतीशाळा
शेतीशाळा 
मुख्य बातम्या

कृषीला ‘बूस्ट’ देण्यासाठी राबविणार शेतीशाळा ‘पॅटर्न’

Vinod Ingole

नागपूर ः राज्यात कृषी विस्ताराला बूस्ट देण्यासाठी कधी काळी प्रभावी ठरलेल्या शेतीशाळांची मदत घेतली जाणार आहे. पारंपरिक पिकांसाठीचे पूरक तंत्रज्ञान बांधापर्यंत पोचविण्यात हा `पॅटर्न’ प्रभावी ठरल्याची बाब लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.  पीक लागवड ते काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यांत कोणते तंत्रज्ञान प्रभावी ठरते आणि पिकाची त्या-त्या टप्प्यात कशी काळजी घ्यावी याविषयीचे मार्गदर्शन शेतीशाळेमधून केले जाते.  

गावातील एका शेतकऱ्याच्या प्लॉटची निवड करून त्या ठिकाणी दर आठवड्याला शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान प्रसाराचे काम होते. शेतीशाळांमध्ये गावातील तीस शेतकरी सहभागी असावेत, असा नियम आहे. या शेतकऱ्यांनी गावातील इतरांपर्यंत देखील हे तंत्रज्ञान पोचवावे, असादेखील या शेतीशाळांचा उद्देश आहे. 

शेतीशाळांचा हा पॅटर्न राज्यात प्रभावी ठरल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविला. त्यामुळेच येत्या हंगामात कृषी आणि पूरक तंत्रज्ञान विस्ताराकरिता शेतीशाळाची मोठी मदत घेण्याच्या विचारात कृषी विभाग आहे. त्या दृष्टीने नियोजनदेखील करण्यात आले आहे. दर आठवड्याला होणाऱ्या या शेतीशाळांमध्ये शेतकऱ्यांच्या विरंगुळ्याचेदेखील काही उपक्रम राबविले जातात. त्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना चालना देण्याचेदेखील काम होते. अशा प्रकारे दुहेरी हेतू साध्य होत असल्याने शेतीशाळा प्रभावी माध्यम ठरणार आहे.  पीकनिहाय घेतल्या जाणार शेतीशाळा ज्या भागात जे पीक आहे; त्या पिकावर आधारित शेतीशाळा घेतल्या जातील. औषधी वनस्पती असलेल्या भागात त्या पिकाची शेतीशाळा राहील. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा या पिकांच्यादेखील शेतीशाळा राहतील.

प्रतिक्रिया शेतीशाळांकरिता आराखडा तयार केला जाणार आहे. अमरावती विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पानपिंपरी व इतर औषधी वनस्पती घेतल्या जातात. त्यामुळे त्या पिकांसाठीदेखील शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत.  - सुभाष नागरे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT