नाशिक : वाघाड प्रकल्पावर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून पाणी वापर संस्थांना शेती विकासाच्या संबंधित संधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर महासंघाच्या शिष्टमंडळाने जलसंपदा विभागाकडे केली. वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या शिष्टमंडळाची बैठक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व्ही. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरी विश्रामगृह, नाशिक येथे नुकतीच झाली. या वेळी ही मागणी करीत पाणी वापर संस्थांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. वाघाड प्रकल्पावर पूर्वीच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. संस्थेने यासाठी इमारतसुध्दा बांधलेली असून, हा प्रकल्प १३० कोटी रुपयांचा आहे. शेतकऱ्यांनी १३ कोटींच्या भागभांडवलाची गुंतवणूक करणे अपेक्षित होते. परंतु, भागभांडवल जमा न झाल्याने या कंपनीचा कारभार ठप्प झाला असल्याचे संघातर्फे सांगण्यात आले. त्यावर श्री. शिंदे यांनी वाघाड प्रकल्पावरील शेतकऱ्यांनी यावर पुनर्विचार करावा. कंपनी परिचालनाबाबत तपशीलवार चर्चा करावी व यासंबंधी अधीक्षक अभियंता यांच्याकडे बैठक घेऊन या विषयास चालना देण्यात यावी, असे सुचविले. यासह वाघाड प्रकल्पाबाबत असलेल्या अडचणीबाबत चर्चाही या वेळी झाली. वाघाड प्रकल्पस्तरीय संघास कालवा मुखाशी शासनाकडून पाणी मोजून देण्यात येते व शासनाच्या रब्बी व उन्हाळ हंगामाच्या दरानुसार संघास आकारणी करण्यात येते. कालवा वहन व्यय विचारात घेता संघाकडून शासनाच्या जवळपास दुप्पट दराने पाणी वापर संस्थांना आकारणी करण्यात येते. त्यामुळे पाणी वापर संस्थांसाठी आकारणीचा दर जास्त वाटत असल्याने संघाकडून पाणी घेण्याऐवजी शासनाकडून थेट पाणी घेतलेले बरे, असे पाणी वापर संस्थांचे मत आहे. यावर विचार व्हावा, अशी मागणी संघाने केली. फॅसिलिटी सेंटरचे काम हे पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने त्यासंबंधीची आचारसंहिता करून त्याचा त्वरित वापर होण्याबाबत चर्चा झाली. बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे अध्यक्ष तुषार वासाळ, संचालक श्री. पिंगळ, रामनाथ वाबळे, समाज परिवर्तन केंद्राचे सरचिटणीस लक्ष्मीकांत वाघवकर, सचिव बाळासाहेब कदम उपस्थित होते. ....केलेल्या प्रमुख मागण्या
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.