सचिंद्र प्रतापसिंह
सचिंद्र प्रतापसिंह 
मुख्य बातम्या

नव्या आयुक्तांनी झटकली कृषी खात्याच्या फायलींवरील धूळ

टीम अॅग्रोवन

पुणे : कृषी खात्यात आयुक्तालयापासून गावपातळीपर्यंत आलेली मरगळ झटकण्यासाठी विद्यमान कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवारी कार्यालयात पाचारण करून आयुक्तांनी सर्व फायलींवरील धूळ झटकून कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यास भाग पाडले.  शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यासाठी प्रशासकीय कागदपत्रांचे वर्गीकरण हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. बहुतेक कार्यालयांमध्ये फाइल्सचे वर्गीकरण झालेले नसल्यामुळे पुणे मुख्यालयापासून ते गावपातळीपर्यंत कागदपत्रे धूळ खात पडलेली होती. आयुक्तांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी २८ व २९ ऑक्टोबरला सुटीच्या दिवशी कामावर येण्याचे फर्मान काढले होते.  ‘‘दिवाळीमधील सुट्यांचा माहोल कायम असताना आयुक्तांनी सुटीच्या दिवशी कामावर बोलविल्यामुळे अनेक कर्मचारी अनुत्सुक होते; मात्र आयुक्त स्वतःदेखील सुटी न घेता कामकाज करणार होते, तसेच सर्व संचालकांना अचानक भेटी देण्याचादेखील आदेश आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे सुटीच्या दिवशी कर्मचारी उपस्थित राहिलेच; पण अपेक्षेप्रमाणे कागदपत्रांवरील धूळ झटकून वर्गीकरणाची मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  राज्यातील शेतकरीवर्गाच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले कृषी आयुक्तालय हे कृषी योजनाविषयक कामकाजाचे मध्यवर्ती स्थान आहे. योजनांची चांगली अंमलबजावणी आणि जलद सेवा ही बाब केवळ फायलींच्या (नस्ती) वर्गीकरणावर अवलंबून असते; मात्र आयुक्तालयात ‘ड’ (अनावश्यक कागदपत्रे) वर्गीय कागदपत्रे व अभिलेख मोठ्या प्रमाणात पडून आहेत. जुनाट कागदांमुळे अस्वच्छता वाढून कर्मचारीवर्गाचा उत्साह कमी होतो, असे आयुक्तांना आढळून आल्यामुळेच ही मोहीम सुरू करण्यात आली.  चांगला पगार मिळतो..चांगली सेवाही द्या..! कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी काही कार्यालयांना अचानक भेटी दिल्या. त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्याला शासनाकडून चांगला पगार मिळतो मग चांगली सेवादेखील दिली पाहिजे. कामकाजाची जागा स्वच्छ असावी व त्यामुळे मन प्रसन्न राहते. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे लवकर होतात. यातून शासनाचा हेतू सफल होतो, असे आयुक्तांनी सूचित केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT