Agitation for street work of 'Swabhimani' in Parbhani
Agitation for street work of 'Swabhimani' in Parbhani 
मुख्य बातम्या

परभणीत ‘स्वाभिमानी’चे रस्त्यांच्या कामांसाठी आंदोलन

टीम अॅग्रोवन

परभणी ः पंतप्रधान ग्रामसडक योजना, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेली रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मुरूम टाकून आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शेतीमाल विक्रीसाठी नेत असताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थ्यांनादेखील त्रास होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अनेक कामे मंजूर झाली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. 

वांगी (ता. परभणी) या गावासह अनेक ठिकाणची सुरू झालेली कामे बंद पडली आहेत. अनेक ठिकाणची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे ही कामे सुरू करावीत. दर्जेदार कामे होण्यासाठी त्यावर लक्ष ठेवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, देविसदास शिंदे, भास्कर खटिंग, प्रल्हाद शिंदे, राजू शिंदे, रामभाऊ आवरगंड, बालाजी गरुड आदींनी कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवर मुरूम टाकून आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT