पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन 
मुख्य बातम्या

पीक विम्यासाठी परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलन

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर :  नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक  शेतकऱ्यांना २०१७ मधील पीकविम्याची भरपाई द्यावी, या मागणीसाठी परभणीमधील शेतकऱ्यांनी कोल्हापुरात बुधवारी (ता. ३) ठिय्या आंदोलन केले.

कोल्हापुरातील जुना सर्किट हाउस येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ठिय्या मांडला. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी अशी मागणी केली. अखिल भारतीय किसान सभा पीक विमा संघर्ष समितीच्या वतीन हे आंदोलन करण्यात आले आंदोलक जुना सर्किट हाउस इथे येताच शिष्टमंडळाने कार्यालयात उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना निवेदन देऊन चर्चा करावी, अशी विनंती केली; या विनंती नंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने यात लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात कॉम्रेड विलास बाबर यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT