कोल्हापूर : अन्यायी दूध खरेदी कपातीच्या विरोधात सोमवारी (ता. २७) आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)वर मोर्चा काढला. (छायाचित्र- बी. डी. चेचर)
कोल्हापूर : अन्यायी दूध खरेदी कपातीच्या विरोधात सोमवारी (ता. २७) आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादकांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)वर मोर्चा काढला. (छायाचित्र- बी. डी. चेचर)  
मुख्य बातम्या

‘गोकुळ’च्या दूध दरकपातीच्या विरोधात लढा तीव्र करणार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात केलेल्या कपातीचा निर्णय हा दुर्देवी असून, शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. संघाने दूध दरात वाढ नाही केली तर यापुढे लढा तीव्र करणार अाहे, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी (ता. २७) येथे दिला.

गोकुळने दर कमी केल्याच्या निषेधार्त श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, की सध्याच्या संचालक मंडळाने सहकाराच्या जोरावर स्वत:चे घर भरून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तो नजीकच्या काळात खपवून घेतला जाणार नाही. आम्ही गोकुळ संपविण्यासाठी नाही; तर गोकुळ दूध संघाच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन करीत आहोत.

सध्या दूध संघात चाललेला गैरप्रकार हा संतापजनक आहे. याच्या विरोधात आम्ही लढा सुरू केला आहे. आमच्या घामाच्या, कष्टाच्या जिवावर हा दूध संघ उभा आहे. भागभांडवल शंभर कोटींच्या वर आहे. यामुळे प्रश्‍न विचारायचा आमचा हक्क आहे.

गोकुळचा कारभार एकमताने चाललेला नाही. उत्पादकांच्या हितासाठी आम्ही विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर तुम्ही द्यावे, अशी आमची मागणी आहे. वार्षिक सभा गुंडाळून संचालकांनी बेजबाबदारपणा दाखविला. याच्या विरोधात आम्ही सहकार न्यायालयातही जाणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. ‘अनावश्‍यक खर्च कमी करा; उत्पादकांना जादा दर मिळेल’ कमी केलेला २ रुपयांचा दर तुम्ही देऊ शकता हे ऑडिट रिपोर्टवरुू समजू शकते. गाय व म्हशीच्या दुधाची भेसळ करून दूध संघ फायदा मिळवतो. पण तो कागदावर येत नाही. दूध वाहतूक, बल्क कूलर, जाहिराती, संचालकाच्या गाड्या, भाड्याच्या गाड्या यावर बेसुमार खर्च होत आहे. या खर्चाबाबत या रिपार्टमध्ये आक्षेप नोंदविण्यात आलेले आहे. अनावश्‍यक खर्च कमी केल्यास दूध उत्पादकांना नक्कीच जादा दर मिळू शकतो, असे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT