नाशिक जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसामुळे तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
नाशिक जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसामुळे तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसामुळे तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

टीम अॅग्रोवन

नाशिक : मान्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे. लागवडीखालील एकूण ७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकूण साडे चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत.  जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नुकसानीची पातळी वाढली. यात सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासकाच्या आदेशानुसार यंत्रणा शेतीच्या नुकसानीसंबंधीत पंचनाम्याच्या कामाला सुरवात झाली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. सर्वात जास्त नुकसान मालेगाव तालुक्यात जिरायती, बागायती व फळपिकांचे झाले आहे. पेठ तालुक्यात नुकसान नसल्याचा कृषी विभागाची माहिती कृषी विभागाने प्राथमिक अहवालात नमूद केली आहे. सर्वात जास्त फटका मका, सोयाबीन या खरीप पिकांना तर फळपिकांमध्ये सर्वात जास्त फटका द्राक्ष बागांना बसला आहे. 

आत्तापर्यंत नुकसानीचे १८% पंचनामे पूर्ण  नाशिक जिल्ह्यात पंचनामे सुरू झाले असून सोमवार (ता. ४) पर्यंत ४ लाख ५६ हजार ९३१ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी ८० हजार ८१० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याचा माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ १८ टक्के क्षेत्रावर पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील नुकसान असे 

  • बाधित गावे  :  १६२१
  • एकूण शेतकरी  :   ४५६९३१
  • एकूण बाधित क्षेत्र  :  ३०४५६२ . ८५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT