After 11 months the crop compensates
After 11 months the crop compensates 
मुख्य बातम्या

अकरा महिन्यांनंतर पिकांची नुकसानभरपाई

टीम अॅग्रोवन

पुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येतात. गेल्या वर्षी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील शेतकरी संतोष किसन शेलार यांच्यासह दहा शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पंचनामे केले, तरीही नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या दारात फेऱ्या मारण्याचे सोडून दिले होते. त्यानंतर अकरा महिन्यांनी नुकसानभरपाई मिळाली असल्याचे समोर आले आहे.   

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील शेतकरी संतोष शेलार व अन्य दहा शेतकऱ्यांनी भारतीय एक्सा या विमा कंपनीकडे गहू, कांदा व इतर रब्बी पिकांचा २०१८ मध्ये रीतसर विमा उतरविला होता. दरम्यान, जानेवारी २०१९ मध्ये मोठा गारपिटीचा पाऊस होऊन रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. याचे विमा कंपनी व कृषी विभाग यांनी नुकसानीचे संयुक्त पंचनामे केले होते. 

पंचनामा झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये पिकांची नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. तरीही शेतकऱ्यांना विम्याची नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर कंपनीकडे हेलपाटे मारल्यानंतर तेथे जाण्याचे सोडून दिले. कंपनी टाळटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करून ही बाब त्याच्या निदर्शनास आणून दिली. 

अखेर विमा कंपनीला जाग आल्याने विमा कंपनीने वडगाव रासाई येथील अकरा शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे. नुकसानीची रक्कम मिळाल्याने या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, याकामी कृषी सहायक अण्णा फराटे यांचे सहकार्य लाभल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT