कोल्हापूर : पंजाब हरियानातील शेतकरी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी दिल्लीत जमले आहेत, केंद्र मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर सध्या स्फोटक स्थिती आहे. सरकारने जर जाणीवपूर्वक हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, सरकारने एक पाऊल मागे घेऊन यातून सकारात्मक तोडगा काढावा, अन्यथा केंद्राला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १५) येथे पत्रकार परिषदेत दिला. शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी आंदोलनात सरकार फसले आहे. आता प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या आंदोलनाला जातीय, राजकीय रंग दिले जात आहेत. मात्र संपूर्ण देश या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा संयम संपण्यापूर्वी सरकारने यावर निर्णय घ्यावा. केंद्राने लॉकडाऊनच्या काळात अत्यंत घाईगडबडीने तीनही विधेयके मंजूर करून घेतली. यावर फारशी चर्चा झाली नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. मोदी यांनी रक्तरंजित क्रांती होण्याची वाट पाहू नये. वेळीच धोका ओळखून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.’’ या वेळी जालिंदर पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.