Voting
Voting 
मुख्य बातम्या

सांगलीतील ८७४ सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर

टीम अॅग्रोवन

सांगली : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सहकारी संस्थांच्या निवडणूकीवर झाला आहे. राज्य शासनाने निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने जिल्ह्यातील ८७४ सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या ३ हजार ५९८ इतकी आहे. वर्षभरात एक हजार ४२९ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यात अ व ब या मोठ्या वर्गातील व ज्यांचे कार्यक्षेत्र जिल्हाबाहेर विस्तारलेले आहे, अशा संस्थांचा समावेश आहेत. निवडणुका लांबणीवर गेलेल्या संस्थांमध्ये सोसायट्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, नागरी बँकासह मोठ्या पतसंस्थांचाही यात समावेश आहे. मार्च महिन्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सहकारी सोसायट्यांचा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली होती. त्याच दरम्यान, कोरोना विुषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने निवडणुका पुढील आदेश येईलपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले होते. या परिपत्रकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेसह, विविध कार्यकारी सहकारी सोसायची, नागरी बँका, पतसंस्थांच्या निवडणुका थांबल्या आहेत. आता शासनाचा निर्णय येत नाही तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

संस्था संख्या
विकास सोसायट्या ३६१
औद्योगिक सहकारी संस्था १४
खरेदी-विक्री संघ
नागरी पतसंस्था
नागरी सहकारी बँका ११
पगारदार बँक
प्रक्रिया संस्था
मध्यवर्ती ग्राहक संस्था
सेवक पतसंस्था २५

वर्गनिहाय लांबणीवर गेलेल्या संस्था

अ वर्ग
ब वर्ग ४३१
क वर्ग २९०
ड वर्ग २४
एकूण ८४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT