80 percent useful water storage In the dams of Jalgaon
80 percent useful water storage In the dams of Jalgaon 
मुख्य बातम्या

जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने सिंचन प्रकल्पांत ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. 

जिल्ह्यात सप्टेंबरअखेर परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मात्र अजूनही जिल्ह्यात काही दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सुरुवातीला हवामान विभागाने सरासरीनुसार पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जून- जुलैच्या सुरुवातीला मॉन्सूनने तब्बल १५ ते २० दिवसांचा खंड दिला. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सरासरी पर्जन्यमानानुसार जून ते सप्टेंबरदरम्यान आतापर्यंत १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चांगली आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात गेल्या २४ तासांत ५५.२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. हतनूर प्रकल्पात ८०.५९ टक्के, तर गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ९ मिलिमीटर पावसासह ३.१३ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली. प्रकल्पात ६८.४२ टक्के साठा आहे. वाघूर प्रकल्पासह अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, अग्नावती, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. मोर ९२.७४, बहुळा ९९.८, अंजनी ८७.५६, गुळ ४७.९७, तर सर्वांत कमी भोकरबारीत १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. 

‘गिरणा’तून वर्षभर पाणी 

जिल्ह्यातील अनेक तालुके व ग्रामीण पाणीयोजना सर्वांत मोठ्या गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्प २००८ नंतर गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरत आहे. १७ सप्टेंबर २०१९ व १७ सप्टेंबर २०२० ला योगायोगाने गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यानंतर पाच हजार क्युसेक व नंतर प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली होती.

मात्र या वर्षी उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे गिरणा प्रकल्प आणि या प्रकल्पांवरील चणकापूर ९७, अर्जुनसागरमध्ये ९७.७६ पाणीसाठा आहे. हरणबारी, केळझर, नागासाक्या या प्रकल्पांतून होणाऱ्या विसर्गामुळे सद्यःस्थितीत केवळ ६८.४२ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT