औरंगाबाद विभागात ५४ लाख टनांचे गाळप
औरंगाबाद विभागात ५४ लाख टनांचे गाळप 
मुख्य बातम्या

औरंगाबाद विभागात ५४ लाख टनांचे गाळप

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड, तसेच खानदेशातील जळगाव व धुळे या पाच जिल्ह्यांतील २१ साखर कारखाने यंदा उस गाळप करत आहेत. या कारखान्यांनी आजवर ५४ लाख १५ हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यापासून ५० लाख ४७ हजार ९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाने दिली.  औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील सहा जिल्ह्यांत यंदा ६० ते ६५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज होता. गत काही वर्षांत या सहाही जिल्ह्यांतील कारखान्यांचा हंगाम यंदा अपेक्षेच्या कसोटीवर खरा उतरण्याची चिन्हे होती. या अपेक्षेनुसार मराठवाडा व खानदेशातील सहा जिल्ह्यांतील २१ कारखान्यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत ५४ लाख १५ हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.  या उसाच्या गाळपातून आजवर ५० लाख ४७ हजार ९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वच साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.३२ टक्‍के आला आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी ८.७५ टक्‍के, तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वांत जास्त सरासरी ९.४८ टक्‍के साखर उतारा राहिल्याची माहिती साखर विभागाने दिली.  रक्‍कम वाटपाची स्थिती गाळपासाठी उचल केलेल्या उसाच्या रकमेपोटी २१ कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ७८.६६ टक्‍के रक्‍कम वाटप केली आहे. ३१ जानेवारीपूर्वीच्या अहवालानुसार गाळप केलेल्या उसापोटी उत्पादकांना ७८९७९.४९ लाख रुपये वाटप करणे अपेक्षित होते. कारखान्यांनी त्यापैकी ६२१२१.५७ लाख रुपयांचे वाटप केले. १९०७१.७१ लाख रुपयांचा एरीअस साखर विभागाच्या अहवालात दिसतो आहे. कारखाने, तसेच ऊस गाळप (मेट्रिक टनात) व  साखर उत्पादन (क्‍विंटलमध्ये) साखर उतारा (टक्‍क्‍यात)

जिल्हा कारखाने संख्या ऊस गाळप साखर उत्पादन सरासरी उतारा
औरंगाबाद. ९२७२२५. ८६२२०० ९.३४
जालना ५. १२९८५९१ १२२११७५ ९.४
बीड. ७. २२०२२९० २०४६७५० ९.२९
जळगाव २. ३१६७४० २७७०५० ८.७५
नंदुरबार. ६७०६६९ ६३५९२०. ९.४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT