grampanchayat  
मुख्य बातम्या

डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले करार 

शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सात-बारा उपक्रमाबाबत महसूल विभागाशी करार करणाऱ्या बॅंकाची संख्या आता ५१ झाली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल सात-बारा उपक्रमाबाबत महसूल विभागाशी करार करणाऱ्या बॅंकाची संख्या आता ५१ झाली आहे. फेरफार व खाते उतारे बँकांना ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेले बँक पोर्टल आता लोकप्रिय होत आहे. राज्यात सध्या विविध बँकांच्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त शाखांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. 

डिजिटल सात-बारा उपक्रमातून मुख्यत्वे शेतकरी वर्गाला पीककर्ज वितरणात सुलभता यावी या उद्देशाने बँकांसोबत महसूल विभागाने चांगला समन्वय ठेवला आहे. सध्या या उपक्रमासाठी https://g२b.mahabhumi.gov.in/banking_application/ वेब पोर्टल विकसित केले जात आहे. 

जमाबंदी आयुक्तालयाच्या ई -फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्याकडून या पोर्टलवर जास्तीत जास्त बॅंकांचा लाभ घेण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे ९ जूनअखेर राज्यातील ५१ बँकांशी संस्थांनी सामंजस्य करार झाले आहेत. 

सहा लाख ९० हजार कागदपत्रे ऑनलाइन  शासनाशी करार झालेल्या बॅंका आता डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारे, खाते उतारे व फेरफार माहिती ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेत आहेत. या बॅंकांनी शेतकऱ्यांशी संबंधित आतापर्यंत सहा लाख ९० हजार कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून घेतली आहेत.  जिल्हा बॅंकांचा सहभाग  या उपक्रमात सहभागी होण्यासाठी बॅंकांना जमाबंदी आयुक्तालयासोबत करार करावा लागतो. विशेष म्हणजे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंका यात वेगाने सहभागी होत आहेत. आतापर्यंत सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, बुलडाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, बीड, यवतमाळ या जिल्हा बॅंकांचा समावेश आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dragon Fruit Farming : ऊस पट्ट्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीतील प्रयोग

Cotton Farming: योग्य व्यवस्थापनामुळे कोरडवाहू क्षेत्रातूनही उत्तम उत्पादन

Citrus Farming: संत्रा, मोसंबीसाठी सिलिकॉन फायदेशीर

Farmer Producer Organisations : भारतातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भविष्य काय?

Women In Agriculture: तिला बाजारात सन्मानाचा कोपरा मिळेल?

SCROLL FOR NEXT