कर्जवाटपासाठी जिल्हा बॅंकांना ५०० कोटीचा निधी 
कर्जवाटपासाठी जिल्हा बॅंकांना ५०० कोटीचा निधी  
मुख्य बातम्या

कर्जवाटपासाठी जिल्हा बॅंकांना ५०० कोटीचा निधी 

टीम अॅग्रोवन

पुणे: लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना खरिपाकरीता वेळेत कर्ज मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना तातडीने ५०० कोटीचा कर्ज निधी देण्याचा निर्णय शिखर बॅंकेने घेतला आहे.  ‘‘जिल्हा बॅंकांनी गेल्या खरिपात शिखर बॅंकेकडून सहा हजार कोटीचे कर्ज घेतले होते. यंदा देखील आम्ही भरपूर तरतुद केली आहे. बॅंकांचे प्रस्ताव येताच कर्ज वाटप केले जाईल. त्यासाठी आम्ही नाबार्डकडून धोरणानुसार पहिल्या टप्प्यातील ५०० कोटीचा निधी आम्ही जिल्हा बॅंकांकडे दोन दिवसात वर्ग करणार आहोत,’’ अशी माहिती शिखर बॅंकेच्या सूत्रांनी दिली.  लॉकडाऊनमुळे डळमळीत झालेल्या कृषी पत पुरवठा व्यवस्थेला आधार देण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने दोन आठवडयापूर्वी केली होती. त्यानुसार, सहकारी व ग्रामीण बॅंका तसेच सुक्ष्म आर्थिक पुरवठा संस्थांना २५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला हा निधी दिला आहे. 

४.८ टक्के व्याजदराने देणार निधी  नाबार्डच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप सुलभ होण्यासाठी देशातील विविध सहकारी बॅंकांना पुनर्वित्त निधी (रिफायनान्स फंड) वाटण्यासाठी ही लगबग सुरू आहे. हा कर्ज निधी ४.८ टक्के व्याज दराने बॅंकांना मिळणार आहे. 

‘‘नाबार्डने आतापर्यंत १२ हजार ७६७ कोटी रुपये पुनर्वित्त योजनेखाली विविध बॅकांना उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्रात शिखर बॅंकेने इतर राज्यांच्या आधी मागणी नोंदविली. त्यामुळे जवळपास ५०० कोटीचा निधी शिखर बॅंकेच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसाठी उपलब्ध झाला आहे,’’ अशी माहिती नाबार्डच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT