50 percent loss of Muga in Nagar district
50 percent loss of Muga in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात मुगाचे ५० टक्के नुकसान

टीम अॅग्रोवन

नगर  ः चांगल्या पावसाने मुगाचे क्षेत्र वाढले खरे, मात्र तोडणीवेळीच पाऊस आल्याने मुगाचे पीक हातचे जाऊ लागले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. तोडणीला आलेल्या मुगाच्या शेंगांना जागेवरच कोंब फुटले. सुमारे पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील मुगाचे पन्नास टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मुगाचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे. 

जिल्ह्यात यंदा सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मुगाचे क्षेत्र वाढले. यंदा मुगाची सरासरीच्या तुलनेत १५१ टक्के म्हणजे ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सर्वाधिक नगर तालुक्यात १९ हजार ५७३, पारनेर तालुक्यात २२ हजार ४२९, कर्जत तालुक्यात चारा हजार ७६० हेक्टरवर मुगाचे क्षेत्र आहे. सतत चांगला पाऊस राहिल्याने काही भागातील मुगावरील रोगाचा झालेला प्रादुर्भावाचा अपवाद वगळता मुगाचे पीकही नेहमीपेक्षा चांगले आले. त्यामुळे मूग उत्पादक शेतकरी खुश होते. 

आता मुगाच्या शेंगा तोडणीला आल्या आहेत. बहूतांश भागात तोडणीला सुरवातही झाली आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची सतत रिपरिप सुरु आहे. अनेक भागात सुर्यदर्शन नाही. सततच्या पावसाने मुगाच्या वाळलेल्या शेंगा भिजल्या. शेंगात जागेवर मुगाला कोंब फुटले आहेत.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५० टक्के मुगाचे नुकसान झाले. हाती आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने मूग उत्पादक हतबल झाले आहेत. कोंब आलेल्या मुगाला आता दराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

बाजारात आवक सुरु

मुगाचे क्षेत्र ज्या वर्षी चांगले असते, त्यावर्षी नगर बाजार समितीत ऑगस्टमध्ये मुगाची बऱ्यापैकी आवक असते. गेल्या काही दिवसांपासून मुगाची आवक सुरु झाली आहे. सध्या नगरमध्ये ४५०० ते ७००० हजार रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळत आहे. बुधवारी ९०० क्विटंल मुगाची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली. 

सततच्या पावसाने मुगाचे नुकसान होत आहे. अनेक भागात तोडणीला आलेल्या मुगाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करुन पीकविमा लागू करावा. नुकसान भरपाई द्यावी.  - हरिभाऊ केसभट, प्रदेश संघटक, शिवबा संघटना, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT