सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख
सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेकडून हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः उन्हाळ्याची तयारी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू झाली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हातपंप दुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हातपंप दुरुस्तीसाठी ५० लाख, तर पाइप खरेदीसाठी ४१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.  श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी समितीचे सभापती अनिल मोटे, बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे, उमेश पाटील, किरण मोरे, अतुल पवार, ज्योती पाटील, नितीन नकाते, त्रिभुवन धाईंजे, आनंद तानवडे उपस्थित होते. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पण सध्या थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य पाणी टंचाईवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच तातडीने यावर निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार हातपंप आणि पाईपचा विषय आला. त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली. तसेच अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये, महाळुंग-श्रीपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत, नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा ठरावही बैठकीत घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. पुळूज व करोळे (ता. पंढरपूर) या दोन ग्रामपंचायतींना व्यापारी गाळे बांधण्यासाठी अनुक्रमे २२ व सात लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णयही या वेळी झाला.  

  • कान्होपात्रानगर (ता. मंगळवेढा) या ग्रामपंचायतीस स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मंजुरी 
  • ‘एनटीपीसी’कडून दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शाळेसाठी ५६ लाख तर रस्त्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी 
  • आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक पुरस्कारासाठी ३५ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद 
  • बेगमपूर व भंडारकवठे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी प्रत्येकी ३१ लाख देणार 
  • अनेक गावांतील ग्रामपंचायतींना डिजिटल केबलद्वारे इंटरनेट देणार 
  • महावितरणच्या विविध प्रश्‍नांच्या संदर्भात पुढील आठवडाभरात बैठक लावण्यात येणार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

    Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

    SCROLL FOR NEXT