साखर निर्यात
साखर निर्यात 
मुख्य बातम्या

चीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या हालचाली

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला करण्यासाठी साखर उद्योगात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या १२ डिसेंबरला चीनचे शिष्टमंडळ राज्यातील काही कारखान्यांसोबत चर्चादेखील करणार आहे. ही चर्चा योग्य दिशेने गेल्यास तसेच चीनमधील धोरणात्मक निर्णय अनुकूल असल्यास राज्यातून ५-६ लाख टन साखर टन साखर निर्यात होईल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ यांच्याकडून राज्यातील साखर निर्यातीला चालना देण्यासाठी उच्चस्तरावरून नियोजन चालू आहे.  देशात सध्या अतिरिक्त साखरेचा मोठा साठा असून गाळप हंगामदेखील सुरू झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कच्ची साखर निर्यात करून देशांतर्गत साखर बाजार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व साखर उद्योगाकडून संयुक्तपणे सुरू आहे. साखर निर्यातीबाबत चीनशी अतिशय सकारात्मक चर्चा सुरू असून सर्व काही जुळून आल्यास किमान २० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला साखर निर्यातीचा १५ लाख ३८ हजार टनाचा कोटा मिळालेला आहे.  "चीनचे प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून तेथे काही निवडक साखर कारखानदारांना भेटणार आहेत. ही चर्चा योग्य दिशेने गेल्यास तसेच चीनमधील धोरणात्मक निर्णय अनुकूल असल्यास राज्यातून ५-६ लाख टन साखर टन साखर निर्यात होईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना एफआरपी पेमेंट करण्यासाठी होईल,’’ असे मत साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आले.  साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात भागात बंदर उपलब्ध असून तेथून चीनकडे साखर निर्यात करणे दोन्ही देशांसाठी अनुकूल राहील. चीनमध्ये असलेल्या शुगर रिफायनरीज उद्योगाला कच्ची साखर आयात करण्यासाठी वर्षातून सप्टेंबर आणि जानेवारी असे दोन वेळा चीन सरकार कोटा वाटून देते. यंदा सप्टेंबरचा कोटा संपला आहे. मात्र जानेवारीचा कोटा मिळताच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. चीनमधील आयातदारांनी होकार दर्शविताच राज्यातील साखर कारखान्यांमधील कच्ची साखर निर्यात करण्याच्या नियोजनाला वेग येईल. त्यामुळे या आयातीमधून निश्चित किती उलाढाल होईल हे आताच सांगणे अवघड आहे, असे मत साखर उद्योगातील अभ्यासकांनी व्यक्त केले. साखरेचा प्रश्न...

  • देशात सध्या अतिरिक्त साखरेचा मोठा साठा
  • हंगाम सुरू होऊनही साठा कायम
  • कच्ची साखर निर्यातीसाठी केंद्र व साखर उद्योगाकडून प्रयत्न
  • निर्यातीबाबत चीनशी सकारात्मक चर्चा
  • देशातून २० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता
  • राज्याला १५ लाख ३८ हजार टनांचा कोटा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

    Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

    Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

    Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

    Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

    SCROLL FOR NEXT