चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

नगर : बेशिस्त ९० छावण्यांना पावणेचार लाखांचा दंड

टीम अॅग्रोवन

नगर ः जनावरे जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या छावण्या अजूनही सुरू आहेत. प्रशासनाचे लक्ष कमी झाल्याचे समजून बेशिस्तपणा करणाऱ्या, सुविधा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९० छावण्यांना तीन लाख ७९ हजार ८९५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईचा आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला.  जनावरांच्या छावण्यात पशुधनाच्या सुविधेत दिवसेंदिवस अनियमितता आढळून येत आहे. याबाबत तपासणी पथकांकडून अहवाल विचारात घेऊनच कारवाई करण्यात आली. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात ५११ छावण्या मंजूर झाल्या आहेत. जूनपर्यंत यांपैकी ५०४ चाराछावण्या सुरू होत्या. त्यांत दाखल असलेल्या लहान-मोठ्या पशुधनाची संख्या तीन लाख ३६ हजार इतकी होती.  दरम्यान, जूनपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे चाराछावण्यांची संख्या घटली आहे. जुलैच्या सुरवातीला साडेतीनशे छावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा चारा छावण्यांची संख्या वाढली आहे. आजअखेर जिल्ह्यात २३५ छावण्या सुरू आहेत. त्यांत एक लाख ३८ हजार १८६ पशुधन दाखल आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या चारा छावण्यांतून योग्य पद्धतीने सुविधा मिळतात का, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क राहिले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्देशानुसार चारा छावण्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी नियमितपणे सुरू आहे. तपासणीमध्ये त्रुटी आढळल्याने आजपर्यंत ७० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड झालेल्या तालुकानिहाय छावण्या

श्रीगोंदे    ३२
जामखेड    २७
नगर   १७
कर्जत    ०७
शेवगाव    ०४
नेवासे  ०१
पारनेर  ०१
पाथर्डी    ०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT