Sugar-Factory
Sugar-Factory 
मुख्य बातम्या

राज्यात ३७८० कोटींची एफआरपी थकली 

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील ५८ साखर कारखान्यांनी चालू हंगामात शेतकऱ्यांना तीन हजार ७८० कोटी रुपयांची एफआरपी अजूनही दिलेली नाही, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.  ३० एप्रिलपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपोटी १२ हजार ७८५ कोटी रुपये चुकते करायला हवे होते. त्यातील ९४ टक्के म्हणजे १२ हजार ३६ कोटी रुपये रुपये देण्यात आले. साखर कारखान्यांचे गाळप आतापर्यंत ५४५ लाख टनापर्यंत पोहोचले आहे.  साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत मार्चच्या मध्यापर्यंत अनुकूल स्थिती होती. साखरेचे स्थानिक दर चांगले होते. निर्यात व्यवस्थित चालू होती. त्यामुळे काही कारखाने एफआरपी वेळेत किंवा आधीच देण्याच्या स्थितीत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे नियोजन कोलमडले, असे साखर महासंघाचे म्हणणे आहे.  कोरोनामुळे थकली एफआरपी  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्र सरकारकडून हा मुद्दा सोडविता येणे शक्य असल्याचे सांगितले. कारखान्यांची इच्छा असूनही यंदा शेतकऱ्यांची एफआरपी काही प्रमाणात थकीत राहण्यास कोरोनाचे संकट कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.  निर्यात अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा  एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना त्यांची साखर विकली जाणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊनमुळे साखरेला उठाव नाही. निर्यात ठप्प आहे. त्यामुळे कारखान्यांचा अंतर्गत आर्थिक स्त्रोत बंद झालेले आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांचे थकीत निर्यात अनुदान तातडीने अदा केल्यास शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी निधी प्राप्त होवू शकतो. त्यासाठी आमचा केंद्राकडे सतत पाठपुरावा सुरू आहे, असे प्रकाश नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT