नाशिक : दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण
नाशिक : दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण 
मुख्य बातम्या

नाशिक : दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण

टीम अॅग्रोवन

नाशिक : खरीप पीककर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात येत आहे. आत्तापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटीपर्यंतचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, वितरण प्रक्रियेतील दोष दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात साप्ताहिक बैठकीचे आयोजन दर बुधवारी करण्यात येत आहे, त्या वेळी श्री. मांढरे बोलत होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे, अग्रणी बँकेचे व्यस्थापक अर्धंदू शेखर, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांसह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  श्री. मांढरे म्हणाले की, वितरण प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे कर्जाची थोडीफार थकबाकी असेल तर त्यांनी तातडीने ती जमा केली, तर ते शेतकरी नवे कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बँकेशी तातडीने संपर्क करून पूर्तता करावी, असे आवाहनही श्री. मांढरे यांनी केले. श्री. मांढरे म्हणाले, ‘‘पीककर्ज वाटप करताना बँकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज लवकर मिळावे, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. बँकांना येणाऱ्या अडचणींचे देखील तत्काळ निरसन केले जात आहे. तसेच, प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्जवाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देऊन त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येत आहे.’’

बँकांनी डिजिटल पद्धतीचा वापर करावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटप करताना बँकांनी अधिकाधिक डिजिटल पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल व त्यांना वेळेत पीककर्ज मिळेल. तसेच, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील बोजा नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात येतील. कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी बल्क एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना पीककर्जाविषयीची माहिती पोहचवून ती माहिती शेतकऱ्यांना मिळाल्याची खात्री देखील करावी, असेही मांढरे यांनी  या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT