हापूस आंबा
हापूस आंबा  
मुख्य बातम्या

तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यात

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून इंग्लंड, कॅनडा, दुबईसह अमेरिकेला तीस टन हापूसची निर्यात आतापर्यंत करण्यात यश आले आहे. सध्या पणन मंडळाचे हे प्रक्रिया केंद्र निर्यातदाराला चालविण्यास देण्यात आले आहे. हंगाम संपेपर्यंत या केंद्रातून शंभर टनापर्यंत निर्यातीचे लक्ष्य पणन मंडळाने ठेवले आहे. प्राथमिक प्रक्रिया करून फळाची हाताळणी करण्यासाठी पणन मंडळाने रत्नागिरीत आंबा प्रक्रिया केंद्र सुरू केले होते; मात्र त्याला प्रतिसाद कमी मिळत होता. गतवर्षी अवघा दहा टन आंबाच निर्यात करता आला. यावर्षी खासगी निर्यातदारामार्फत हे प्रक्रिया केंद्र चालविण्यास सुरवात केली आहे. या केंद्रामध्ये आलेल्या आंब्याची तपासणी करून ग्रेडिंग केले जाते. त्यानंतर त्या-त्या देशाला आवश्यक त्या प्रक्रिया त्यावर होतात.  अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला आंबा पाठविताना विकिरण प्रक्रिया (रेडिएशन) अत्यावश्यक असते. त्यासाठी आंबा वाशीला पाठविण्यात येतो. तत्पूर्वी रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रात तो ४८ डिग्री सेल्सिअसला तीन मिनिटे ठेवून त्यावर हॉट वॉटर ट्रीटमेंट केली जाते. त्यातून बाहेर काढल्यावर आंबा ब्रशिंग, वॉशिंग, ड्रायिंगमधून काढला जातो. पुढे त्याचे अंतिम ग्रेडिंग करून पॅकिंग केले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर विकिरण प्रक्रियेसाठी वाशीत पाठविण्यात येतो. वाशीतून पुढील सफर हवाईमार्गे सुरू होते. ही सेवा संबंधित निर्यातदारांमार्फतच होते. प्रसन्न पेठे, मनोज काणे यांसारख्या बागायतदारांकडून अमेरिका, ऑस्ट्रेलियाला आंबा पाठविण्यात आला आहे. दुबई, कॅनडासाठी अन्य देशांप्रमाणे कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही; मात्र आंब्यावर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव राहू नये, यासाठी प्राथमिक प्रक्रिया केल्या जातात. तसेच वॉशिंग, ब्रशिंग आणि ग्रेडिंग याच प्रक्रिया केंद्रात केले जाते. नुकतेच रत्नागिरीतून दुबईला १५ टन आंबा पाठविण्यात आला. या केंद्रातून स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेला आंबाही पिकवून दिला    जातो. आतापर्यंत १०९ टन आंबा पिकवून दिला आहे. त्यासाठी एका पेटीस पन्नास रुपये दर आकारला जातो. प्रक्रिया केंद्रातील सेवेचे दर असे

  • तीन किलोचा बॉक्स ने-आणसाठी दीड रुपये
  • ग्रेडिंगसाठी तीन ३ रुपये बॉक्सला
  • हॉट वॉटरसाठी तीन किलोच्या बॉक्सला २५ रुपये
  • आंब्यासाठीचे फोम नेट प्रतिनग १ रुपया
  •  कामगार वापरासाठी बॉक्सला २० रुपये
  • बॉक्स हाताळणीसाठी २ रुपये
  • आतापर्यंत निर्यात झालेला आंबा

  • दुबईला १५ टन
  • युरोपला ३ टन ६०० किलो
  • अमेरिकेला ३ टन ५०० किलो
  • कॅनडाला ८ टन 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

    Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

    Cotton Market : कापूस का काळवंडला?

    Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

    Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

    SCROLL FOR NEXT