हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून 
मुख्य बातम्या

हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे सर्व पाच तालुक्यांतील १२ लोकवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून २६ हजार ९३४ लोकसंख्येला १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण १३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. वाढते तापमान, बाष्पीभवन, उपशामुळे प्रकल्प तसेच विहिरी, बोअर कोरडेठाक पडत आहेत. सर्व पाच तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट गहिरे होत आहे. 

तीव्र पाणी टंचाई उद्भभवल्यामुळे हिंगोली तालुक्यातील २ गावातील ३ हजार लोकसंख्येला, कळमनुरी तालुक्यातील ३ गावांतील ४ हजार २१९ लोकसंख्येला, वसमत तालुक्यातील एका गावातील ३ हजार २५ लोकसंख्येला, औंढनागनाथ तालुक्यातील १ गाव आणि दोन वाड्यावरील २ हजार १२० लोकसंख्येला, सेनगांव तालुक्यातील ३ गावांतील १२ हजार ५७० लोकसंख्येला ४ शासकीय आणि १४ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाई उद्भवलेल्या गावामध्ये १२० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टॅंकरसाठी ११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय टॅंकर सुरू असलेली गावे ः हिंगोली ः कनका, लोहगाव, कळमनुरी ः माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., वसमत ः बाभूळगाव, औंढानागनाथ ः रामेश्वर, (संघनाईक तांडा व काळापाणी तांडा), सेनगाव ः जयपूर, सेनगाव, कहाकर खु.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT