24 villages in Yavatmal district are sensitive during monsoon
24 villages in Yavatmal district are sensitive during monsoon 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील २४ गावे माॅन्सून काळात संवेदनशील

टीम अॅग्रोवन

यवतमाळ ः जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या पूरसदृष्य परिस्थितीमुळे दीडशेच्या जवळपास गावे बाधीत होतात. त्यामध्ये नदी काठांवरील १० तालुक्‍यांतील २४ गावे संवेदनशील असून तेथील प्रशासनाला आवश्‍यक त्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या माॅन्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण, जिल्हा व्यवस्थापन अधिकारी सतीश मून उपस्थित होते.

ललितकुमार वऱ्हाडे म्हणाले, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी माॅन्सून चांगला आहे. ही नक्‍कीच समाधानाची बाब आहे. मात्र, अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. मोठ्या नद्यांच्या पुरांमुळे २१ गावे बाधित होतात. नदी काठावरील दहा तालुक्‍यांतील २४ गावे अतिसंवेदनशील असून १३२ गावे संवेदनशील आहेत. या सर्व गावात खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने असे खड्डे त्वरित बुजवावे. त्याकरिता प्रगतिपथावर असलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी सूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केली.

पर्जन्यमानात केला शासनाने बदल शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे जिल्ह्याचे पर्जन्यमान पूर्वीच्या ९११.३४ वरुन ९२६.८० मिलिमीटर झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT