अप्पर वर्धा प्रकल्पात २२ टक्‍के पाणीसाठा 
मुख्य बातम्या

अप्पर वर्धा प्रकल्पात २२ टक्‍के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन

अमरावती : सिंचन आणि पाण्याचा स्रोत असलेल्या मोर्शी तालुक्‍यातील अप्पर वर्धा धरणात गाळ साचला आहे. परिणामी धरणात केवळ २२ टक्‍के जलसाठा उरल्याने उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची भीती आहे.

मोर्शी तालुक्‍यात संत्रा लागवड क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांतील पाण्याच्या माध्यमातून अडचणीच्या वेळी संत्रा उत्पादक पाण्याची गरज भागवितात. परंतु धरणातील अल्प जलसाठ्यामुळे सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात तालुक्‍यातील अनेक गावांवर पाणीसंकट कोसळले आहे.

अप्पर वर्धा प्रकल्पाची एकूण क्षमता ६७८.२७ दशलक्ष  घनमीटर असून, तूर्तास धरणात २३८.४६ दलघमी पणी आहे. केवळ १२४.२४ (२२ टक्‍के) जलसाठा पिण्यासाठी उपयुक्‍त उरला आहे. गाळ काढण्याची व खोलीकरणाची मागणी समोर आली आहे. 

मोर्शी तालुक्‍यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली. भूजलाचा बेसुमार उपसा झाल्याने भूगर्भाची चाळणी झाली आहे. सरकारच्या लेखी ड्राय झोन असलेल्या या भागात बोअरवेल घेऊन त्यातून जमिनीची चाळणी केली जात आहे. महसूल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हे सारे होत असल्याची चर्चा परिसरात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT