आॅनलाइन व्यवहार
आॅनलाइन व्यवहार 
मुख्य बातम्या

आॅनलाइन व्यवहार केल्यास २० टक्के सवलतीचा प्रस्ताव

गणेश कोरे

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या हाेणाऱ्या आॅनलाइन लिलाव आणि शेतकऱ्यांना ई-पेमेंट करणाऱ्या अडते, व्यापारी, खरेदीदारांना बाजार शुल्कात २० टक्के सवलत देण्यात यावी. याबराेबरच पणन संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या एकल परवानाधारकांनादेखील बाजार समित्यांमधील खरेदी आॅनलाइन करणे अनिवार्य करावी, असा प्रस्ताव पणन मंडळाने पणन संचालनालयाकडे सादर केला आहे.  या विविध प्रस्तावांची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ‘ॲग्राेवन’ला दिली. पवार म्हणाले, की शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने ई नाम याेजना सर्व राज्यांना लागू केली आहे. यानुसार महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांमध्ये शेतमालाची प्रवेशद्वारावरच संगणकीय नाेंदणी आणि आॅनलाइन लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही याेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समित्यांमधून शेतमालाची आॅनलाइन खरेदी करणाऱ्या अडते, व्यापारी आणि खरेदीदारांना बाजार शुल्कामध्ये २० टक्के सवलत देण्यात यावी, असा प्रस्ताव पणन संचालनालयाला देण्यात आला आहे. तसेच पणन संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या एकल परवानेधारकांना (सिंगल लायसन्स) खरेदी आॅनलाइन पद्धतीनेच करावी, अशी अट परवान्यामध्ये टाकावी आणि ई-नाम राबविण्यात येणाऱ्या ३० बाजार समित्यांमधील अडत्यांंच्या परवाना नुतनीकरणासाठी ई-लिलाव आणि ई-पेमेंटची अट टाकण्यात यावी, अशा तीन मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT