बोंडअळी
बोंडअळी  
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा १५ टक्के प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यातील पूर्वहंगामी कापसाच्या क्षेत्रात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तो सुमारे १५ टक्के असल्याचे नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.  या शास्त्रज्ञांनी नुकतीच जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर तालुक्‍यात कापूस पिकाची पाहणी केली. त्यात डॉ. विश्‍लेष नगरारे, डॉ. बाबासाहेब फड यांचा समावेश होता. कापूस पिकाची पाहणी केल्यानंतर या शास्त्रज्ञांनी कृषी विभागाकडे आपल्या पाहणी कार्यक्रमात आढळलेल्या बाबींची माहिती दिली. त्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव सध्या १५ टक्के आहे. एका शेतात तीन दिवसांपूर्वी लावलेल्या कामगंध सापळ्यात २४ पतंग जमा झाले होते. वेळीच नियंत्रण करायला हवे; अन्यथा आर्थिक नुकसानीची पातळी वाढेल, असा इशारा या शास्त्रज्ञांनी दिला. 

जळगावातील शेतकरी सजग मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने मोठे नुकसान कापूस पिकात झाले. नुकसानीची पातळी मोठी होती. यंदा जळगाव जिल्ह्यात शेतकरी मात्र सजग दिसत आहेत. अनेक शेतांमध्ये कामगंध सापळे आहेत. शेतकरी प्रतिबंधात्मक उपाय करीत आहेत, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले. 

जळगाव जिल्ह्यात अधिक, विदर्भात कमी गुलाबी बोंड अळी विदर्भात कमी दिसत आहे. कारण तिकडे पूर्वहंगामी कापसाची लागवड कमी आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र अधिक प्रादुर्भाव विदर्भाच्या तुलनेत आहे. बुलडाणा जिल्ह्यातही पाहणी केली. तेथे कोरडवाहू कापूस पिकात बोंड अळी नसल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यातही बुधवारी (ता.१) या शास्त्रज्ञांनी पाहणी केल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात साडेचार लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली असून, यातील ६० हजार हेक्‍टर क्षेत्रात पूर्वहंगामी कापसाची लागवड झाली आहे. या पूर्वहंगामी कापसाच्या क्षेत्रात गुलाबी बोंड अळी पुढे नियंत्रण केले नाही तर वाढू शकते, अशी भीती या शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT