kolhapur flood
kolhapur flood 
मुख्य बातम्या

सांगली : पुरबाधीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १३१ कोटी रुपये प्राप्त 

टीम अॅग्रोवन

सांगली : सांगली जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेक्टरपर्यंतच्या पीक कर्ज माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी आतापर्यंत जिल्ह्याला १३१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.  गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरपरिस्थीतीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एक हेक्टर पर्यंच्या पीक कर्जास माफी देण्यात आली होती. सदर कर्जमाफीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पूरबाधीत शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील २२ हजार ५७३ शेतकऱ्यांची व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांची ५ हजार ८७३ शेतकऱ्यांची अशी एकूण २८ हजार ४४६ शेतकऱ्यांचा कर्जमाफी रक्कमेचा मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यानुसार ८० कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूरबाधीत शेतकरी कर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ५० कोटी ९१ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता.  एप्रिल मध्ये झाला आहे. यापैकी २५ कोटी रुपये इतकी रक्कम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पूरबाधीत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित २६ कोटी इतकी रक्कम राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडे लेखापरिक्षण होत असलेल्या यादीनुसार वर्ग करण्याबाबतीच कार्यवाही सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT