1,245 in Pune district ‘Vikel to Pickel’ sales outlets
1,245 in Pune district ‘Vikel to Pickel’ sales outlets 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’ विक्री केंद्रे

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘विकेल ते पिकेल’ अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते आहे. पुणे जिल्ह्यात या अभियानाने १२४५ ठिकाणी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था उभी केली आहे. शेतकऱ्यांना या विक्री व्यवस्थेने चांगलाचा आत्मविश्‍वास दिला आहे.

अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरू करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी केली आहे. आजअखेर १ हजार ३५२ ठिकाणे निश्चित करून १ हजार २४५ ठिकाणी प्रत्यक्ष विक्री सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी तसेच शेतकरी गट यांना किमान १०० ठिकाणी शेतीमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण २५० शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना ठोक खरेदीदार, प्रक्रियादार तसेच निर्यातदारांना शेतीमाल मूल्यसाखळी अंतर्गत जोडण्यात येत आहे.

जिल्ह्यात उत्पादीत पिकासाठी एकूण ५२ मूल्यसाखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, शेतीमाल विक्रीसाठी नाममुद्रा (ब्रॅण्ड) विकसित करण्यात येत आहेत. भात पट्ट्यातील भात उत्पादक शेतकरी थेट विक्रीसाठी सरसावले आहेत. वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाची ‘राजतोरण’ हा ब्रॅण्ड बनवला आहे.

चालू वर्षी कोरोना काळात तब्बल २२ टनांहून अधिक तांदळाची विक्री केली आहे. त्या माध्यमातून या ब्रॅण्डचा डंका गावागावांत पोहोचला आहे. या शिवाच वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरोना कालावधीत ‘राजगड’ या ब्रॅण्डच्या ३५ ते ४० टन तांदळाची थेट विक्री केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT